प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे : स्वेतलाना अहिरे ( नायिका )
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
‘प्रेम’ म्हणजे खर काय ? युवक – युवती प्रेमा मध्ये अडकले की वेडे होतात. त्यांना भान रहात नाही. त्यांना त्यावेळी जन्म दिलेल्या आई – वडिलांचीही फिकीर नसते. कधी – कधी प्रेम विवाह घटस्फोटाकडे जाताना दिसतात. मात्र हा चित्रपट म्हणजे प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा आहे. ‘ असा विश्वास मजनू चित्रपटातील मुख्य नायिका स्वेतलाना अहिरे हिने येथे व्यक्त केला.
मजनू हा चित्रपट 10 जून रोजी सुमारे पाचशे चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीम ने कर्जतकरांची भेट घेण्याचे ठरविले. कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात यावेळी एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लेखक गोवर्धन दोलतोडे, सह निर्माता इरफान भोपली, चित्रपटाचा नायक रोहन पाटील, नायिका स्वेतलाना अहिरे आदी उपस्थित होते.
संदीप ओसवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अकबर यांनी प्रास्ताविकात भेटीचा उद्देश सांगितला. कथा, पटकथाकार, निर्माता, गीतकार गोवर्धन दोलतोडे चित्रपटाबद्दल सांगताना, ‘प्रेम ठरवून करता येत नाही. प्रेम कसे करावे. त्याचा शेवट कसा झाला पाहिजे. आई वडिलांनी त्या प्रेमाला कसे आजच्या काळात वर्ष सहा महिन्यात घटस्फोट होतात. एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या घटना. हे कुठेतरी थांबावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून हा चित्रपट आम्ही समोर आणला आहे. मराठी चित्रपट का हिट होत नाहीत. याचा अभ्यास करून आम्ही दक्षिणेच्या टीमचाही याध्ये सहभाग घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील नैसर्गिक वातावरणात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून त्याचे गाणे आधीच हिट होत असून भविष्यात प्रत्येक हळदी समारंभात तसेच विवाह सोहळ्यात वाजविले जाईल. असे स्पष्ट केले.
सह निर्माता इरफान भोपली यांनी, हा चित्रपट महाराष्ट्रातील सुमारे पाचशे चित्रपट गृहात उद्या एकाच वेळी झळकणार असून आमच्या चित्रपटाद्वारे मिळणाऱ्या मॅसेज मुळे विस्कळीत झालेली कुटुंबे व्यवस्थित होतील यात शंका नाही. तुम्ही सर्वांनी हा चित्रपट पहा. मराठी चित्रपट हिट होत नाहीत असे म्हणतात परंतु हा चित्रपट नक्कीच सर्वांना आवडेल व गर्दीचे उच्चांक गाठेल. असा विश्वास व्यक्त केला. नायक रोहन पाटील याने चित्रीकरणा दरम्यान झालेले किस्से सांगून हा चित्रपट करताना काय काय गमती जमती झाल्या हे सांगितले. नायक व नायिकेने चित्रपटातील काही हिट संवाद सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
Be First to Comment