सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील स्वामीराज व अन्नदा फाऊण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळाघर बौद्धवाडी व गाव येथे २०० कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून स्वामीराज व अन्नदा फाऊण्डेशनच्या वतीने नेहमीच विविधांगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. त्याच अनुषंगाने सध्या कोरोना या महामारीने सर्वत्र थैमान माजविले असल्याने हातावर कमविणा-यांना जीवन जगताना फारच तारेवरची कसरत करावी लागते.
कामधंदा बंद झाल्याने आर्थिक उत्पन्नाचे साधनच नसल्याने ब-याचजणांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.अशा गरजू परिवारांना दोन्ही फाऊण्डेशनच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी गावचे अध्यक्ष देविदास शिर्के ,सल्लागार सचिन मोरे,स्वामीराज फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश माने,उपाध्यक्ष दीपक माळी,खजिनदार मारुती चव्हाण, सह खजिनदार विनायक माने,महेश चव्हाण,सुशील बामणे,हृषीकेश माने,चिंतामणी माने,महेश वालंज,महेश माने,शैलेश चव्हाण,विनीत मोरे,रोशन माने,गीतेश नवशे,रामजी माने, स्वप्नील वालंज आदी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.तसेच निवी आदिवासी वाडी व भुवनेश्वर आदीवासी वाडी येथेही सुमारे ८०कुटुंबियांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले .यावेळी वरसे ग्रामपंचायत उपसरपंच अमित मोहिते व अन्य मान्यवर होते.






Be First to Comment