Press "Enter" to skip to content

“मजनू” १० जून ला चित्रपटगृहात

“मजनू” चित्रपटाच्या टीमने घेतली पनवेलकरांची भेट : पनवेल ची श्वेतलाना अहिरे आहे मजनू ची नायिका

सिटी बेल ∆ मनोरंजन प्रतिनिधी ∆

“मजनू” या मराठी चित्रपटाचे सह- निर्माते इरफान मेहबूबअली भोपाळी यांनी पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी मराठी चित्रपट ‘मजनू’ १० जून रोजी येत असल्याचे सांगून चित्रपटाविषयी माहिती दिली. मजनू या चित्रपटाची नायिका कोण आहे याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेन्स कायम होता आज अखेर या रहस्यावरचा पडदा उघडण्यात आला. पनवेल ची रहीवासी असलेली श्वेतलाना अहिरे ही या चित्रपटाची नायिका असल्याचे रहस्य यावेळी उलगडले.

यावेळी ‘मजनु’ चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे निर्माते गोवर्धन दोलताडे, चित्रपटातील अभिनेता रोहन पाटील अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटा बाबत माहिती देण्यात आली असून या चित्रपटात अभिनेते “लागिर झालं जी” या टीव्ही वाहिनी वरील ‘आज्या’ म्हणजे नितेश चव्हाण मुख्य भिमिकेत असून अभिनेत्री श्वेतलाना अहिरे ही कस्तुरीच्या भुमिकेत असून सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे ,अरबाज शेख, प्रणव रावराणे , आदिती सारंगधर, माधवी जुवेकर ,भक्ती चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट फक्त प्रेम कथा नसून समाजासाठी नवीन सु-संदेश देणारा चित्रपट असल्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे अशी माहिती शिवाजी दोलताडे सह निर्माते इरफान भोपाळी यांनी दिली. लवकरच जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा असे आवाहन या पत्रकार परिषदेत माध्यमातून नागरिकांना करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.