आज नव्याने ८ रूग्ण आढळले;एका रुग्णाचा मृत्यू : ग्रामीण भागातही पसरतोय ज्वर
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
रोहे तालुक्यासह ग्रामीण भागात
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत चालला आहे.आज नव्याने ८ रुग्ण पाँझीटिव्ह सापडले आहेत तर तालुक्यांची एकूण रुग्ण संख्या ही ६२९ झाली आहे.
औद्योगिक वसाहत लाभलेल्या रोह्यात व ग्रामीण भागात दररोज पाँझीटिव्ह रूग्ण सापडू लागल्याने शहरासह ग्रामीण भागात भितीदायक वातावरण पसरले आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने ८ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ६२९ वर पोहोचली आहे.तर रोहे नागोठणे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील रूग्ण सापडल्याने सर्वत्र भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या १५२ रूग्णांवर उपचार सुरू असून ४६१ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.तर तालुक्यातील आज एका रूग्णाचा म्रुत्यू झाल्याने एकूण मृत्यू संख्या १६ वर पोचली आहे.
कोरोनाचा आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.तर मी सुरक्षित तर माझा परिवार सुरक्षित, परिवार सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर देश सुरक्षित ही भावना प्रत्येकाने मनाशी बाळगणे गरजेचे आहे.अशाप्रकारे प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे.






Be First to Comment