Press "Enter" to skip to content

वीर वाजेकर महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

सिटी बेल ∆ उरण ∆ सुनिल ठाकूर ∆

दिनांक-६/६/२०२२ रोजी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. कमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून प्राचार्य,डॉ.पी.जी.पवार यांच्या हस्ते शिवज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.कमला तलाव ते कोट नाक्यापर्यंत शिवज्योती रॅली काढण्यात आली.बोकडवीरा गावात शिवज्योती फेरी काढण्यात आली,पुढे कॉलेज पर्यंत फेरी संपन्न झाली.

शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करून,महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताचे गायन झाले.शिवस्वराज्य दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.व्याख्याते डॉ.भानुदास शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, प्राचार्य, डॉ.पी.जी.पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून एकूण कार्यक्रमाचा आढावा घेतला.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षेकतर सेवक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सी.डी.धिंदळे यांनी केले,डॉ.सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.एस.टी. गोतपगार यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.