Press "Enter" to skip to content

तब्बल ९३४ सायकलपटू स्पर्धकांचा सहभाग

भव्य “उलवे सायक्लोथॉन २०२२” स्पर्धेला उदंड प्रतिसाद

२५ किमी पुरुष गटात पुणेच्या प्रणव कांबळे तर महिला गटात कोल्हापूरच्या रंजिता घोरपडे विजेता

सिटी बेल ∆ पनवेल ∆ हरेश साठे ∆

सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७१ वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार, दिनांक ०५ जून) उलवा नोडमध्ये झालेल्या ‘भव्य उलवे सायक्लोथॉन २०२२’ स्पर्धेत राज्यातील तब्बल ९३४ सायकलपटू स्पर्धकांनी सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. २५ किमी पुरुष गटात पुणेच्या प्रणव कांबळे तर महिला गटात कोल्हापूरच्या रंजिता घोरपडे यांनी विजेता होण्याचा सन्मान पटकाविला.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेस प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वाती पानसरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक इंगोले, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, उप महापौर सीता पाटील, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेवक डॉ.अरुणकुमार भगत,
न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरीचंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, योगिता भगत, अजय भगत, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, जयश्री घरत, जयवंत देशमुख, रवींद्र भगत, अनंता ठाकूर, भार्गव ठाकूर, अर्चना मिश्रा, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अंकुश ठाकूर, अवधेश महतो, सुहास भगत, मनोज मोर्य, र्शैलेश भगत, किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्या कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील, शुभांगी पाटील, मोरेश्वर पाटील, राजीव रंजन, सागर रंधवे, मंडळाचे कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी, श्यामनाथ पुंडे, उलवे सेना सामाजिक संस्थेचे अक्षय काशीद, पल्लवी सुर्वे, सचिन आवटे, गुड्डू कनोजिया, मनोज सिंह, अमित झा, अनिल सनस, वांची एस, विकी भिडे, किरण लोहकरे, फरहान चॅटर्जी , डॉक्टर रवी दिघे, नित्यानंद पांडे, गोकुळ पुरी, रोषणी डिमेलो, सुवर्णा सनस, सरोज मानवटकर, ओमकार कदम यांच्यासह पदाधिकारी, सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सायकलिंग आयकॉन म्हणून ७१ वर्षीय राज शर्मा, ६८ वर्षीय रमाकांत महाडिक, १२ वर्षीय सई पाटील, तर जगभर सायकल भ्रमंती करणाऱ्या शितल बांबूलकर यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत, त्या अनुषंगाने सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले होते. हि स्पर्धा महिला व पुरुष प्रकारात आणि २५ किमी, १५ किमी, १० किमी व ०३ किमी अंतर या चार गटात पार पडली.
विशेष आकर्षण असलेल्या २५ किलोमीटर अंतराच्या पुरुष गटात प्रणव कांबळे यांनी प्रथम क्रमांक (२० हजार रुपये बक्षिस), द्वितीय क्रमांक कोल्हापूरचे प्रतीक पाटील (१० हजार रुपये), तृतीय क्रमांक मुंबईचे सिद्धार्थ लवंडे (०५ हजार रुपये), चतुर्थ क्रमांक रायगडचे निकेत पाटील (०३ हजार रुपये), तर पाचवा क्रमांक सांगलीचे आमन तांबोळी (०२ हजार रुपये), पटकाविला. अनुप पवार, गिरीष पवार, अजित हिरकणी, हर्षल आहेर व पार्थ पेडणेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

२५ किलोमीटर अंतराच्या महिला गटात प्रणव रंजिता घोरपडे यांनी प्रथम क्रमांक (२० हजार रुपये बक्षिस), द्वितीय क्रमांक नाशिकच्या संस्कृती जाधव (१० हजार रुपये), तृतीय क्रमांक पुणेच्या आदिती शिंदे (०५ हजार रुपये), चतुर्थ क्रमांक स्नेहल माळी (०३ हजार रुपये), तर पाचवा क्रमांक घाटकोपरच्या विधी भानुशाली (०२ हजार रुपये) यांनी पटकाविला. तसेच चैताली शिलधनकर, दिपाली भालेराव, अवणी नातू, सादिका शेख, आणि जयश्री प्रसाद यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास टी शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवक व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी झुम्बा मनोरंजनाचा लाभ प्रेक्षक व स्पर्धकांनी घेत मनमुराद आनंद लुटला. त्याचबरोबर ३ ते ६ वर्षेंपर्यंतच्या लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली फॅन्सी ड्रेस स्पर्धाही विशेष आकर्षण ठरली. या स्पर्धेत काव्या वाघ या चिमुकलीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.

या स्पर्धेच्या अनुषंगाने सोसायटींसाठी विशेष स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्रीन सोसायटीचा प्रथम क्रमांक शंकेश्वर प्लाझो,
द्वितीय क्रमांक भगवती इम्पोरिया, तृतीय क्रमांक प्रोग्रेसिव्ह आयकॉन, सर्वात जास्त सोसायटी सहभाग स्पर्धेत प्रथम क्रमांक युफोरिया सिएचएस, द्वितीय क्रमांक ईशवर ऑरा, तृतीय क्रमांक पार्श्व हाईट, आणि क्लीन सोसायटी स्पर्धेत प्रथम क्रमांक व्हाईट विंग्स, द्वितीय क्रमांक मोरेश्वर हेरिटेज तर तृतीय क्रमांक प्रोग्रेसिव्ह ईव्ही या सोसायटीने पटकाविला. या तीन ही स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे १० हजार, ०३ हजार व ०२ हजार रुपये असे पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

विविध प्रांतांतील लोकं उलवा नोडमध्ये वास्तव्यास आली आहेत. त्यामुळे त्यांनी स्थानिकांसोबत एकरूप व्हावे.या विभागाचा लोकसंख्येच्या अनुषंगाने विस्तार वाढला आहे त्यामुळे करंजाडे व उलवा नोड पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावा, अशी आमची मागणी आहे. ही सायक्लोथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उलवे सेना सामाजिक संस्था, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांनी परिश्रम घेतले त्याचबरोबरीने स्वयंसेवकांची मेहनत महत्वपूर्ण ठरली आहे. ‌ – ‌लोकनेते रामशेठ ठाकूर

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन चांगला पर्याय आहे. उत्तम आयोजनातून संपन्न होत असलेली ही स्पर्धा कौतुकास पात्र आहे. झाडे लावा पाणी वाचवा सोबतच जंक फुडचा वापर टाळा, हिरव्या भाजी खा, हा संदेश सर्वत्र पसरला पाहिजे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी पर्यावरणाचे महत्व टिकवले पाहिजे.
– स्वाती पानसरे, अभिनेत्री

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.