नागोठण्यातील अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार ) :
गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारी (दि. ३) रात्री पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. मुसळधार पावसाने सुधागड तालुका व नागोठणे परिसराला झोडपून काढले. त्यामुळे येथील अंबा नदीने आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे येथील एस.टी. स्टँड लगत असलेल्या टेम्पो स्टँड परिसरात व नागोठणेहून पेणकडे जाण्यासाठी असलेल्या गावातील मुख्य रस्त्यावर पूराचे पाणी आले होते.
दरम्यान हवामान खात्याने दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तरी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील आंबा नदी व खाडी किनारील गावचे ग्रामस्थांनी दक्षता बाळगून पाण्याची पातळी व परिस्थिती पाहून सुरक्षित ठिकाणी आपल्या कुटुंबासाहित स्थलांतरित व्हावे असे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी आधिच केले होते. तर अंबा नदीने सकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नागरिकांनी कुणीही नदीकिनारी वा पुराच्या पाण्याच्या जवळपास जाऊ नये असे आवाहन नागोठण्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक यांच्याकडून करण्यात आले होते.
Be First to Comment