बलाप येथील धान्य मिलमध्ये आढळला 8 फुटी अजगर !
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील बलाप गावाजवळील एका धान्य मिलमध्ये एक भला मोठा 8 फुटी अजगर आढळला होता. मिल मध्ये अजगर आढळल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सर्पमित्रांना बोलाविले. सर्पमित्र नरेश मोहिते, तुषार केळकर व प्रणित यांनी मोठ्या शिताफिने या अजगराला पकडले आणि सुखरूप सोडले.
या आधी जून महिन्यात देखील याच मिलमध्ये 8 ते 10 फुटी अजगर आढळला होता. सभोवताली जंगल असल्याने या परिसरात साप व अजगरांचा वावर दिसून येतो. साप म्हटलं की भल्याभल्यांची भंबेरी उडते, मात्र सुधागड तालुक्यातील काही जागरूक नागरिक आता सर्प मित्रांच्या मदतीने सापाला जीवदान देण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेत असल्याचे अनेकदा दिसून आल्याने सर्प मित्रांनी समाधान व्यक्त केले आहे.
कुठेही मनुष्यवस्ती मध्ये साप आढळल्यास घाबरून न जाता त्याला इजा न करता जवळच्या सर्पमित्राला बोलवावे असे आवाहन तुषार केळकर यांनी यावेळी केले.






Be First to Comment