- पेण पुर्व विभागात व्यवसायाला चालना मिळाली …
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)
पेण तालुक्याच्या पुर्व विभागातील वाक्रुळ फाटा येथे नुकतेच स्वराज दूध डेअरी चे उद्घाटन माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना धैर्यशील पाटील म्हणाले की, पेण चा पुर्व विभाग हा नेहमीच गजबजलेला आहे. मात्र येथे दुकानाची कमतरता जास्त जाणवत असल्याने येथील नागरिकांना पेणच्या मोठ्या बाजारपेठचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांची अधिक कुचंबणा होऊ नये म्हणून पुर्व विभागात या दूध डेअरीचे उद्घाटन करण्यात आले आहे.या दूध डेअरी मध्ये दूधासह अनेक दूधाचे प्रकार मिळणार आहेत त्यामध्ये मुलांना कॅटबरी, आयस्क्रिम, श्रिखंड,अम्रखंड, ताक, लस्सी आदि वस्तू मिळणार आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा चांगलाच फायदा होऊन आता ख-या अर्थाने या भागात व्यवसायाला चालना मिळाली आहे.
पेण पुर्व विभागाच्या गणपती वाडी पासुन ते आराव पर्यंत रस्त्यालगत हाॅटेल, पानटपरी, चायनिज सेंटर यासह अनेक वेगवेगळ्या प्रकारची दुकाने पुर्व विभागात बसलेली असुन त्यातच दूधाच्या या डेअरी मुळे या भागाची रेलचेल वाढतच जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी उद्घाटन प्रसंगी स्वराज दूध डेअरीचे मालक शिव पडवल, सामाजिक कार्यकर्ते आर. सी. पाटील, मंगेश दळवी, पो.पा. केशव पाटील, मधूकर पाटील, रमेश ढाकोल, संदिप पाटील, देवराम साळुंखे, भगवान जाधव,लक्ष्मण सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.






Be First to Comment