Press "Enter" to skip to content

सामाजिक कार्यकर्त्यां कांचन जाधव यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खोपोली नगरपालिकेला स्वखर्चाने दिली कोव्हीड रुग्णवाहिका भेट

सिटी बेल लाइव्ह / खोपोली -(संतोषी म्हात्रे )

कोरोनाचा विषाणूने शहरात हातपाय पसरले आहे.दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत असतान बाधीत रूग्णांची प्रकृती अत्यावश्यक झाल्यावर तात्काल रूग्णवाहीका मिळत नाही त्यामुळे रूग्ण दगावण्याची शक्यता आहे.ही गंभीर समस्या लक्षात सामाजिक कार्यकर्त्या उद्योजीका कांचन जाधव यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने स्वखर्चाने पालिका रूग्णालयासाठी कोव्हीड रूग्णवाहीका भेट दिली आहे.

कोव्हीड रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा आज खोपोली नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात करण्यात आला. याप्रसंगी खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर,नगरसेवक राजू गायकवाड, किशोर पानसरे, कानसा वारणा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दिपकदादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजयराव जाधव,पत्रकार बाबू पोटे,शिवसेना नेत्या अनिता पाटील,आसावरी घोसाळकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

      कोरोना बाधित रूग्णांसाठी खोपोली,खालापूर येथील कोव्हीड सेंटर तसेच अत्यावश्यकांना मुंबई,नवी मुंबई  येथे हलविण्यासाठी कुटूंबाची परवड होत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते ही गंभीर समस्या आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ही भावना मनाशी बाळगून पती संजय जाधव यांच्या सहकार्यातून आपल्या शहरातील रूग्णांना मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली असल्याचे समाधान वाटत असल्याचे कांचन जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.कांचन जाधव यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील कोरोना बाधित रुग्णांकरीता स्वखर्चाने कोव्हीड रुग्णवाहिका देत सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल नगराध्यक्षा सुमन औसरमल,मा.नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी कौतुक केले आहे. 

कोव्हीड रूग्णवाहिकेचे लोकार्पण करताना नगराध्यक्षा सुमन औसरमल,दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजयराव जाधव,शिवसेना नेत्या अनिता पाटील, आसावरी घोसाळकर तर दुसरया छायाचित्रात माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर,नगरसेवक राजू गायकवाड, किशोर पानसरे,पत्रकार बाबू पोटे,अंकुश मोरे दिसत आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.