Press "Enter" to skip to content

आपटा ग्रामपंचायत हद्दीतील पाणी समस्या सुटणार

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

आपटा ग्रामपंचायत हद्दीतील आपटा, सारसाई, कोरलवाडी, माडभुवन आदी गावाचा पाणी प्रश्न माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या प्रयत्नातुन पाणी प्रश्न सुटणार आहे.

हा भाग प्रामुख्याने आदिवासी असून या भागात आदिवासी ठाकूर समाजाची लोकसंख्या आहे, मात्र ही गावे डोंगर पठारावर असल्याने येथे पाणी समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे, यासाठी माजी आमदार मनोहर भोईर यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन या वाड्यासाठी तीन ते चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

या वाड्यांचा लवकरच पाणी प्रश्न सुटणार असल्याने आपटा ग्रामपंचायतच्या महाविकास आघाडीच्या सरपंच नाजणींन पटेल आणि शिवसेना, शेकाप, आणि कॉग्रेस महाविकास आघाडीने माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांचे आभार मानले आहेत,अशी माहिती शिवसेना पनवेल तालुका सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील भोवड यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.