सिटी बेल लाइव्ह / उरण (सुभाष कडू)
सध्याच्या कोविड-19 च्या संकटाने रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामूळे नियमित 7, 14 किंवा 21 दिवसांनी रक्ताची गरज असणाऱ्या थॅलेसेमीया रुग्णांना रक्ताच्या तुटवड्यामूळे जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याचा उद्देशाने “जिव्हाळा फाऊंडेशन, महाराष्ट्र” आणि “गोवठणे विकास मंच” यांच्या संयुक्त विद्यमाने “समर्पण ब्लड बँक, घाटकोपर” यांच्या सहकार्याने “क.भा. पाटील विद्यालय, पिरकोन” येथे “रविवार दि: 9 ऑगस्ट, 2020 रोजी स. 10:00 ते 2:00” या वेळेत थॅलेसेमीया रुग्णांसाठी “विशेष रक्तदान शिबिर” आयोजित केले आहे.थॅलेसेमीया रुग्णांना मदत म्हणून रक्तदात्यांनी रक्तदान शिबीराला उपस्थीत राहून रक्तदान करावे आशी विनंती आयोजक जिव्हाळा फाऊंडेशन, महाराष्ट्र आध्यक्ष रुपेश पाटील, कोप्रोली व गोवठणे विकास मंच अध्यक्ष सुनिल वर्तक, गोवठणे यांनी केल आहे.






Be First to Comment