कारागृहातील बंदिजनांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
समता फाऊंडेशन व जिल्हा मध्यवर्ती कारागृह अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.18 मे रोजी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर पार पडले.या शिबिरात डोळ्यांची तपासणी करून कारागृहातील बंदिजनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराची सुरुवात कारागृह अधीक्षक नागेश सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी रसायनी तील माजी सरपंच संदिप मुंढे, पत्रकार राकेश खराडे उपस्थित होते.शिबिरात बंद्यांची नेत्र तपासणी करून डोळ्यांचा आजार असणा-यांना मोफत औषध व चष्मे वाटप करण्यात आले.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी कारागृह पोलिस विभागाने अथक परिश्रम घेतले.








Be First to Comment