Press "Enter" to skip to content

आरोग्य शिबीर संपन्न

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबीर

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर उरण नगरपरिषद शाळा , पेन्शनस पार्क , एनएमएमटी बस स्टँड च्या समोर उरण शहर येथे आयोजित करण्यात आले होते. या महा आरोग्य शिबिराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

सदर आरोग्य शिबिरात जनरल तपासणी, दंत तपासणी,डोळे तपासणी, रक्तदाब तपासणी, हाडांचे आजार तपासणी,मधुमेह रक्त तपासणी,स्त्रीरोग तपासणी , ई . सी. जी आदी तपासण्या मोफत करण्यात आले .तसेच ठराविक चष्म्यावर 50% सवलत देण्यात आली. उरण तालुक्यातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.यावेळी उरण मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरे यांनी गोळ्या औषधे मोफत दान दिली.

आमदार महेशशेठ बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक तथा भाजपा तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी केले. यावेळी नगरसेवक कौशिक शेठ शहा , माजी नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे, एमजीएम मधील डॉक्टर सुभाष जाधव आणि त्यांची टीम,मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर आणि त्यांचे सभासद – बादल म्हात्रे , सनी पाटील, विकास पाटेकर , प्रणय अमृते, किशोर पाटेकर ,गणेश पाटेकर , गिरीष पाटेकर ,शलाका पाटेकर , पुनम पाटेकर , जोस्त्ना पाटेकर , सायली पाटेकर , कल्पिता पाटेकर, शौनक समेळ, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्ते सुमेध पाटील , योगराज करंगुटकर , मधुरा करंगुटकर , प्रेरणा पाटील , कौस्तुभ कोंडीलकर आदींनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.