Press "Enter" to skip to content

विशाल बाफणा कुटुंबाकडून सामाजिक बांधिलकी

सर्वसामान्य नागरीकांसाठी शासनाच्या विविध योजनांची जनजागृती

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू संजीवनी हॉस्पिटल, हक्क दर्शक संस्था व शहरातील लीना विशाल बाफणा यांच्या कुटुंबीयांकडून सामाजिक बांधिलकी जोपासत शासनाच्या विविध योजनांच्या माहितीची जनजागृती करण्यासाठी दि. ९ ते १० मे रोजी ११ ते ५ या दोन दिवसांसाठी घेण्यात आले.

या दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हर्निया, अपेंडिक्स, आतड्यांचे विकार, बायपास शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, मुतखडा, मेंदूचे विकार, मेंदूच्या शस्त्रक्रिया, संधीवात, ग्रंथी विकार, मेंदूमधील गाठ, मेंदूचा कॅन्सर, मेंदूमधील रक्तश्राव, मेंदूच्या शस्त्रक्रिया, पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रिया, हृदयविकार, गलगंड-मुत्रपिंड आजार, डायलिसिस, मणक्याची शस्त्रक्रिया, गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, त्वचा प्रत्यारोपण, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अपघातातील गंभीर दुखापत, लहान बाळाचे फुफ्फुसांचे विकार, कान, नाक, घसा, कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया, अति दक्षता, बाळ रोग अतिदक्षता, त्वचारोग, हाडांच्या प्रत्यारोपण, चेहऱ्यावरील हाडांची शस्त्रक्रिया इत्यादी आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत शस्त्रक्रिया व उपचार विनामुल्य मिळण्यासाठी तालुक्यातील नागरीकांकडून नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला खासदार सुनिल तटकरे यांनी भेट देऊन पाहणी केली.व नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून बाफणा कुटुंब करीत असलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.