सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
घोडीवली गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभल्याने वर्षभर गावात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम पार पडत असताना श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा वै.वा.ह.भ.प.नामदेव गंगाराम पालांडे यांच्या आशिर्वादाने व गुरुवर्य ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न झाल्याने घोडीवली गावात नवचैतन्य पसरले होते.
यावेळी भारत पालांडे, रोहिदास पिंगळे, राजेंद्र पालांडे, सुनील पारांगे ,गणेश पालांडे, सुरेश भोसले, मंगेश भोसले, प्रसाद येरूनकर, प्रणाल पालांडे, विघ्नेश पालांडे, सतिश पालांडे, रोहन पालांडे, सुधीर पारांगे, तानाजी पडोकर, पद्माकर खंडागळे, हर्ष पालांडे आदीप्रमुख ग्रामस्थांसह मोठ्या संख्येने वारकरी मंडळी, तरुण – महिला वर्ग व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण घोडीवली गावात श्री साईबाबा मंदिर २० वा वर्धापन दिन मोठ्या आनंदाने व हरिनामाच्या गजराने संपन्न झाला साईबाबा पालखी सोहळा, सायंकाळी ७ वाजता साईची महाआरती, रात्री ८ वाजता साई भंडारा तसेच रात्री ८ नंतर हरिभजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्याने गावकरी मंडळीमध्ये हरिनामाच्या गजराने नवचैतन्य पसरले होते. तर हा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी श्री समर्थ साई मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ घोडीवली यांनी मेहनत घेतली होती.
Be First to Comment