नावंढे – घोडीवली परिसरात चोरी करणाऱ्या चोरट्याला खालापूर पोलिसांनी केले जेरबंद
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील नावंढे व घोडीवली परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातला असता या चोरीमध्ये चोरट्यांने अनेक घरांमध्ये घुसून चोरी करित सोन्याच्या वस्तू व काही रक्कम लंपास केली होती, या सर्व घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले या चोरट्याला पकडण्याचे खालापूर पोलीसांन पुढे आव्हान राहिले होते, तर खालापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम जलद गतीने सुरू ठेवत नावंढे गावातील सिसिटिव्हि कँमेरेच्या फुटेजवर चोरट्याचे स्केच बनवून चोरट्याच्या मागावर खालापूर पोलीस असताना या अखेर या चोरट्याला पकडण्यात खालापूर पोलीसांना यश आल्याने खालापूर पोलीसाच्या कामगिरीचे कौतुक होते आहे.
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिनाभरा पासून वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असता घोडीवली व नावंढे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरट्यांनी चोरी करित हजारो रुपयांची रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यामुळे या चोरट्याला पकडणे खालापूर पोलीस पुढे मोठे आव्हान होते.

खालापूर पोलीस दिवस रात्र या चोरट्याच्या मागावर असताना खालापूर पोलिसांना मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी सहकार्य करित रात्रभर जागता पहारा देत होते. परंतु चोर हा शातिर बुध्दी असल्याने तो सर्वाना चकवा देत वेगवेगळ्या पध्दतीने चोरी करतच राहिला.
मात्र चोर नावंढे येथील चोरी करताना सीसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाला असता या कँमेरेच्या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांचे स्केज बनवून आपली तपास यंत्रणा जलद गतीने सुरू ठेवली असताना खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्याला जेरबंद करण्यात खालापूर पोलिसांना यश आले असून हा चोरटा मु.पो.शिरबें, जि. सातारा येथील असून त्याचे नाव गौतम विलास माने आहे.
तर या चोरट्याने तीन गुन्हे कबूल केले असल्याने या पुढील अधिक तपास खालापूर पोलीस करित असून खालापूर पोलीसांनी चोरट्याला जेरबंद केल्याने खालापूर पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरिचे कौतुक होत आहे.तसेच खालापूर पोलिसांनी या चोरट्याला घोडीवली व नावंढे गावात केलेल्या चोरीच्या घटनास्थळी नेऊन पंचनामा करित सर्व घटनांची माहिती समजून घेतली आहे.








Be First to Comment