अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार व हत्ये प्रकरणी सरकारने हयगय केल्यास ६० वा मराठा क्रांती मोर्चा तांबडी गावात काढावा लागेल : राजन घाग यांचा सरकारला इशारा
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)
रोह्यात तांबडी गावातील मराठा समाजाच्या कुटुंबातील १४ वर्षाच्या लेकीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केली.माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घृणास्पद घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.दरम्यान घटनेच्या गुन्ह्यात ७ आरोपींना रोहा पोलीसांनी अटकही केली आहे. सदरच्या प्रकरणात आमच्या पीडित ताईला न्याय मिळाला पाहिजे.ज्या कोपर्डीच्या घटनेवरून सबंध महाराष्ट्र पेटला तसा पेटायला काय वेळ लागणार नाही.सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. जर सरकारने याप्रकरणी हयगय केली, प्रकरण दाबून टाकण्याचा किंवा चालढकल करण्याचा प्रयत्न केल्यास ६० वा मराठा क्रांती मोर्चा तांबडी गावात काढावा लागेल असा इशारा मराठा क्रांती मोर्च्याचे शिलेदार राजन घाग यांनी सरकारला दिला.
घरचे रक्षाबंधन सोडून तांबडी येथिल मराठा समाजाच्या कुटुंबियांना धीर देऊन सांत्वन करण्यासाठी आले असता ते म्हणाले.त्यांच्या समवेत प्रफुल्ल पवार,रुपेश मांजरेकर,विलास सुद्रीक,विशाल सावंत,विवेक सावंत,भागवत पानसरे,चंद्रकांत चाळके,चेतन कोरे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.तांबडी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांनी रोहा तालुका सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख,उपाध्यक्ष नितीन परब,संदीप सावंत यांच्याशि सुद्धा चर्चा केली.
दरम्यान मराठा क्रांती मोर्च्याच्या शिलेदारांनी विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन सदरच्या प्रकरणी तपासाबाबत अधिक माहिती घेऊन समाधान व्यक्त केले व समाजातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.






Be First to Comment