Press "Enter" to skip to content

एम जी एम हॉस्पिटल वाशी अंतर्गत

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे मोफत महाआरोग्य शिबिर

सिटी बेल • तृप्ती भोईर • उरण •

उरण मधील उरण नगरपरिषद शाळा , पेन्शनर्स पार्क उरण एन एम एम टी बस स्थानकाच्या समोर दिनांक १५/०५/२०२२ रोजी सकाळी १० .०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण ” यांच्या विद्यमाने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर वाशी नवी मुंबई येथील एम. जी. एम. हॉस्पिटल यांच्या अंतर्गत ठेवण्यात आले आहे. तरी या शिबिराचा लाभ उरण मधील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण” यांच्या आयोजकांनी केले आहे.

सदरच्या या महाआरोग्य शिबिरात केल्या जाणाऱ्या तपासण्या. :-
१) जनरल तपासणी
२) दंत तपासणी
३) डोळे तपासणी
४) रक्तदाब तपासणी
५) हाडांचे आजार तपासणी
६) मधुमेह रक्त तपासणी
७) स्त्री रोग तपासणी
८) ई.सी.जी.
तसेच ठराविक चष्म्यांवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

महाआरोग्य शिबिराचे आयोजक :-
मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण, एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी, आर्ट ऑफ लिव्हिंग उरण,त्रिलोचन आय क्लिनिक उरण.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.