Press "Enter" to skip to content

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांचा 50 वा वाढदिवस साजरा

सिटी बेल • वशेणी • अजय शिवकर •

जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक तथा जिल्हा परिषद कोंढरी शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ज्ञानार्जन क्लासेस वशेणी यांना म का म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त 80 पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली तर 1500/- रू चा रोख धनादेश देण्यात आला.

वशेणी परिसरातील 40 लहान मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊ वाटप श्री रमेश पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला.

वशेणी इतिहास संपादकीय मंडळ व उरण कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सौजन्याने गावा गावात वाचन संस्कृती टिकवण्यात साठी गाव तिथं दैनिक या उपक्रमाचे उद्घाटन रायगड भूषण प्रा.एल बी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

दंडेश्वर मंदिरा समोर दसिटिंग बेंचेसचा लोकार्पण सोहळा सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे आणि वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या प्रसंगी संजय होळकर, श्री.मनोज गावंड, श्री.लवेश म्हात्रे, श्री.जगन्नाथ म्हात्रे, संजीव पाटील, सौ.संगिता म्हात्रे , श्री गणपत ठाकूर, सरपंच जीवन गावंड बी.जे.म्हात्रे ,अनंत तांडेल, पुरूषोत्तम पाटील, प्रविण ठाकूर, रविंद्र पाटील, आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.