सिटी बेल लाइव्ह / बोर्ली #
शेतकरी कामगार पक्षाचा 73वा वर्धापनदिन माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पक्षाचा ध्वज बोर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच मतीन सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांची पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगत असताना सांगितले की,ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारण असे शेतकारी कामगार पक्षाचे धोरण आहे.त्यानुसार पक्ष समाजात काम करीत असताना आपला कोण आणि विरोधक कोण हे न पाहता त्यांचे काम करीत आहे.मात्र विरोधकांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे.आपल्या पक्षाचा कार्यकर्ते हे ज्याच्या पाठीशी राहतील ते शेवटपर्यंत.त्यांच्या पाठीत खंजीर खुपसने हे आपल्या रक्तात नाही आहे.मात्र विरोधक हे वेळोवेळी पक्षांला बदनाम करण्याचे काम करीत असतात.मात्र कार्यकर्ते यांनी त्यांच्या फसव्या बोलण्याला फसू नका असे आव्हान यावेळी चुनेकर यांनी केले.
कोरोना काळात शेकाप कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता काम करीत असून काही जणांनी जीव गमाविले परंतु प्रसिद्धीपासून दूर राहून काम करा काम करीत असताना पहिले आपले कुटुंब यांचे ही कोरोनापासून रक्षण करा असा मौलिक सल्लाही चुनेकर यांनी दिला.
यावेळी बोर्ली शेतकरी कामगार पक्षाकडून मास्क,फवारणी यंत्र, स्टॅनीराईझर आदी साहित्य वाटप केले. यावेळी माजी सभापती नलिनी चुनेकर,रुपेश वर्षोलकर,मुद्स्सार सौदागर,उदय खानावकर,मनोहर भोपी,रौफ मुकादम यांच्यासाहित आदी मान्यवर उपस्थित होते.






Be First to Comment