Press "Enter" to skip to content

जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले च्या वतीने “खेळ पैठणी चा”

सिटी बेल • उरण •


जय भवानी मित्र मंडळ पाले यांच्या वतीने आज 19 वर्ष भवानी मातेच्या यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र या वर्ष माता भवानी म्हणजेच नारी शक्ती यासाठी महिलांना खेळ पैठणी चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात 45 महिला सहभागी झाल्या होत्या. या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात आदेश बांडेकर यांच्या होमिनिस्टर कार्यक्रमाप्रमाणे उरण पनवेल ची शान पपन पाटील आणि शाम ठाकूर सर यांच्या गोड सूत्रसंचालनातून साकार झाला.

या कार्यक्रमात प्रसंगी मान्यवरांचा सन्मान देखील अमर म्हात्रे सर यांच्या आवाजाने झाला. या कार्यक्रमाप्रसंगी पाले गावचे विद्यामान सरपंच समाधान म्हात्रे, सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर ,नरेश गावड , सारडे विकास मंच आणि न्हावा शेवा CHA संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रें यांच्या शुभहस्ते भवानी मातेचे पूजनाने झाली.

प्रेक्षक वर्गाची कमालीची उत्सुकता वाढवविण्याचे काम हे शाम ठाकूर सर यांनी आगदी सुंदर पद्धतीने करत अनेक प्रकारचे खेळ महिलांना खेळायला लावले. शेवटी प्रथम क्रमांकाची मनाची पैठणी च्या मानकरी ठरल्या हर्षदा सदाशिव म्हात्रे तर
दृतीय क्रमांकाची मानाची साडी संगिता हनुमान म्हात्रे ह्यांना देण्यात आली.

या मंडळाचे अध्यक्ष हनुमान म्हात्रे, उपाध्यक्ष विश्वास म्हात्रे, निलेश म्हात्रे, हिराचंद म्हात्रे, अंबरनाथ म्हात्रे यांनी खूप परिश्रम घेऊन पैठणी हा कार्यक्रम संपन्न केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.