सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •
गेली दोनवर्ष कोरोना च्या संकटा मुळे संस्थापक जे के ठाकूर यांच्या कुटुंबियां चे चिर्ले येथील साई नंदिराचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला.
यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने व शासनाने नियम शिथिल केल्याने साई मंदिराचा 25 वा वर्धापन दिन 1 मे रोजी मोठ्या उत्सहात व विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सकाळी 5 वाजता श्रींची काकड आरती साडे पाच वाजता संस्थापक माजी सरपंच श्री जे के ठाकूर व सौ जयश्री ठाकूर यांच्या हस्ते बाबां चे मंगल स्नान. 7. 30 ते 8. 30 वाजता डॉ. चंदन ठाकूर व सौ शीला चंदन ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक. सकाळी 9 ते 12 राधाकृष्ण भजन मंडळ चिर्ले यांचे भजन. बुवा गोवर्धन पाटील पखवाज रामा घरत (जासई ).दुपारी 12 वाजता श्रींची माध्यान्ह आरती पदाजी कुंडाजी ठाकूर यांचे हस्ते. दुपारी 12 ते 2 श्री समर्थ शारदा मंडळ नवीन पनवेल 2.ते 3. 30 गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ गव्हाण कोपर गायिका सुप्रिया घरत पखवाज तुषार घरत 3. 30 ते 5 गावदेवी प्रासादिक भजन कंठवली गायिका वंदना वसंत पाटील,पखवाज मयूर म्हात्रे खोपटे संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ (चिर्ले ). सायंकाळी 6 वाजता धुपारती संध्याकाळी 6.30 ते 8 श्री जय शिव शंकर प्रासादिक भजन मंडळ आवरे बुवा विकास वैश्विकर पखवाज मनिष पाटील रात्री 9 वाजता श्री साई नाथांच्या पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता झाली.
Be First to Comment