सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माडभुवन डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मंगेश लांगी, पोलिस नाईक विशाल झावरे, पोलिस नाईक नंदन पाटील, पोलिस नाईक जयंत भोईर यांच्या पथकाने मौजे माडभुवन डोंगराळ भागात हातभट्टीची तयार दारु करण्याच्या ठिकाणी रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा बेवारस अड्डा उध्वस्त केला आहे.

यात 200 लिटर क्षमतेचे तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेल्या रसायनाने भरलेले चार प्लास्टिकचे ड्रममध्ये व 200 लिटर क्षमतेची एक पत्र्याची टाकी असे एकूण 1000 लिटर रसायन मिळून आले. सदरील रसायन हे जागीच ओतून नाश करून चार प्लास्टिकचे ड्रम जाळून नष्ट केले.व एक पत्र्याची टाकी तोडून नुकसान केले आहे.
रसायनी पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षक म्हणून कैलास डोंगरे यांनी कार्यभार हाती घेताच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तपासातून गुन्ह्यांची उकल काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांची काम करण्याची पद्धत आगळीवेगळी असल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात असल्याने रसायनीकर समाधान व्यक्त करत आहेत.








Be First to Comment