
| स्पॅगेटी, खारघर
श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ, स्पॅगेटी, खारघर यांच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शनपर व संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमासाठी खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मंगेश रानवडे यांनी विशेष पुढाकार घेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, मंत्रालय यांच्याशी समन्वय साधला आणि खारघरकरांसाठी हा महत्त्वपूर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, ७ वा मजला, मंत्रालय येथील वैद्यकीय समन्वयक डॉ. निखील इंगळे यांनी विविध शासकीय वैद्यकीय योजनांची पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
खारघरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राज्य व केंद्र शासनाच्या वैद्यकीय मदतीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले. डॉ. निखील इंगळे यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या संवादात्मक कार्यक्रमासाठी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळाची संपूर्ण व्यवस्थापन समिती उपस्थित होती. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि आयोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी श्री. रविंद्र मानकर, श्री. महेश चव्हाण तसेच मंडळाच्या व्यवस्थापन समितीचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने डॉ. बासूतकर व श्री. आनंद ज्ञाने उपस्थित होते.
हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरला. उपस्थित खारघरकरांनी या उपक्रमाचे स्वागत करून श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळाची संपूर्ण व्यवस्थापन समिती, श्री. मंगेश रानवडे आणि डॉ. निखील इंगळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Be First to Comment