Press "Enter" to skip to content

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांच्या हस्ते कामोठ्यात शाडू मातीच्या गणेशमूर्तीला प्रमाणपत्र


पनवेल, दि.२० (वार्ताहर) : कामोठे येथील कृत्रिम तलावावर गौरी-गणपती विसर्जनाच्या ठिकाणी शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्या भाविकांना पनवेल महानगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी महानगरपालिका अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच गणेशभक्त उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. कृत्रिम तलावावर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याने पर्यावरण संवर्धनासोबतच विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत झाली. यावेळी पोनि मनोहर पगार, शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, पत्रकार संजय कदम यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.