Press "Enter" to skip to content

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग, ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती

पनवेल/ नवी मुंबई (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, ध्वज पथकाची दिमाखदार उपस्थिती आणि पारंपरिक वेशभूषेतील एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने सकाळी विमानतळावर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत ध्वज पथक, लेझीम पथक, अब्दागिरी तसेच ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते.

       नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) गणेशोत्सवानिमित्त ‘द फोक मराठी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात गणपतीवरील भक्तिगीते, कोकणातील कलाकारांच्या संचाने सादर केलेले पारंपरिक बाळ्या नृत्य, तसेच विविध लोकसंगीत आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा साकारत या कार्यक्रमाने विमानतळावरील उत्सवी वातावरणात भर घातली. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या विविध लोककलांची आणि सांस्कृतिक परंपरेची खास झलक अनुभवता आली. या सोहळ्याला प्रवाशांसह एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विमानतळाचा परिसर काहीकाळ महाराष्ट्राच्या लोककलेच्या रंगात न्हावून निघाला होता.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.