Press "Enter" to skip to content

टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी साकारला आकर्षक देखावा

शंभर वर्षाची गणेशोत्सव परंपरा; स्वच्छ ऊर्जेच्या संदेशासह गणेशोत्सव

पनवेल (प्रतिनिधी) गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून टाटा पॉवरच्या खोपोली जलविद्युत प्रकल्पाच्या ऐतिहासिक आवारात गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाही या परंपरेला आधुनिक स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जोडत टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी आकर्षक देखावा साकारला.

बाप्पाच्या मूर्तीभोवती साकारलेल्या लघु-दृश्यात हिरवेगार डोंगर, पवनचक्क्या, केबल-स्टे पुलाची प्रतिकृती, सौर पॅनेल, उपजीविका केंद्र आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन अशा विविध संकल्पनांचा समावेश करण्यात आला. प्रवेशद्वारावर ‘Green Energy for a Better Tomorrow’ हा संदेश देणारी स्वागत कमान उभारण्यात आली होती. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक हरित ऊर्जेचा सुरेख संगम या देखाव्यातून साधण्यात आला.

दरम्यान, टाटा पॉवरच्या भिरा जलविद्युत प्रकल्पातहीजवळपास शतकभरापासून गणेशोत्सव श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. या परंपरेला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना यंदा कर्मचाऱ्यांनी हाताने साकारलेली दगडी गुहा विशेष आकर्षण ठरली. खडकाळ पोत असलेल्या या कमानीवर लटकणाऱ्या वेली आणि उबदार लाल प्रकाशयोजनेने वातावरणात वेगळेच सौंदर्य निर्माण केले होते. या गुहेत फुलांनी सजविलेल्या गणरायाची मनोहारी मूर्ती विराजमान करण्यात आली होती. खोपोली आणि भिरा या दोन्ही प्रकल्पांतील देखाव्यांमधून परंपरा, सर्जनशीलता आणि स्वच्छ ऊर्जेचा संदेश यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.