Press "Enter" to skip to content

गणरायाच्या साक्षीने महापौर बंगल्यात आपुलकीचा स्नेहमेळावा


पोलिसांपासून स्वच्छतादूतांपर्यंत सर्वांना आरतीचा मान; महापौर नितीन पाटील यांचा अनोखा उपक्रम

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिकेच्या खारघर येथील नव्या महापौर बंगल्यात यंदा प्रथमच श्री गणरायाचे आगमन झाले असून, या निमित्ताने अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरतीचा मान देत स्नेहाचे नाते दृढ करण्याचा उपक्रम महापौर नितीन पाटील यांनी सुरू केला आहे. दरम्यान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी महापौर बंगल्यास सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिस विभागाला आरतीचा मान देण्यात आला. यावेळी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जोशी, वाहतूक शाखेचे गुल्फरोज मुजावर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर शहर अभियंता राजेश कर्डिले यांच्यासह ५० हून अधिक अभियंत्यांनी गणरायाची आरती केली. बुधवारी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त व विभागप्रमुखांनी गणरायाचे दर्शन घेतले.

गुरुवारी मुख्य स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्यासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर कार्यरत असलेल्या स्वच्छतादूतांना आरतीचा मान देण्यात आला. सफाई कामगारांचा करण्यात आलेला हा सन्मान विशेष लक्षवेधी ठरला. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे औपचारिक स्वागत न करता महापौर नितीन पाटील स्वतः त्यांच्याशी संवाद साधत असून, आरतीनंतर सर्वांना आपुलकीने जेवणाचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे महापौर बंगल्यातील गणेशोत्सवाला प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.