

पंतप्रधानांनी वाढदिवसात बॅनरबाजी न करता सर्वसामान्यांना विकसित करण्याची भूमिका ठेवली- जिप.सभापती वैकुंठ पाटील
पेण दि. 17 (वार्ताहर) :- केंद्र शासनाच्या मागील पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या विविध स्तरावरील योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हाच उद्देश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवून स्वताच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता सर्वसामान्यांना कसे विकसित करता येईल हीच भूमिका ठेवली असल्याचे रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकसीत भारत संकल्प अभियान राबविण्यात येत असताना त्याची सुरुवात एकात्मिक बाल विकास प्रकल्प पेण यांच्या माध्यमातून आज करण्यात आली.
या दरम्यान आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी होत असलेल्या शासकीय स्तरावरील विकास योजनांच्या चित्र रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, जिप. मुख्याधिकारी नेहा भोसले, आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तहसीलदार तानाजी शेजाळ, पंस.सदस्य कमळ पवार, संतोष गायकवाड, आदिंसह प्रकल्प कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प अभियानाच्या माध्यमातून आपणही रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा दलीपट्ट्यातील आणि वनहक्क जमिनींवर अधिकार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मागील 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेल्या विकासकामांना अधिक गती मिळावी जेणेकरून या देशातील प्रत्येक माणूस हा विकसित भारताचा पाया होईल याच उद्देशाने काम करत आहेत. पूर्वीच्या काळी डोंगर द-यात राहणारा आणि जंगलाची राखण करणारा हा समाज प्रगतीपथावर जावा ही स्थिती लक्षात घेत पंतप्रधानांनी जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत यासह महिला भगिनीसह प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय देत असल्याचे सांगितले.
– धैर्यशील पाटील- माजी खासदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष



Be First to Comment