


भारतीय जनता पक्ष, करंजाडे आणि लोकनियुक्त सरपंच मंगेशदादा शेलार यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी दीपोत्सव ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी
देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करंजाडेत भारतीय जनता पक्ष व श्री.मंगेशदादा शेलार यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेत”आशीर्वादाचा दिवा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
भारतीय जनता पक्ष कार्यालय व गणेश मंदिर, सेक्टर 5A,करंजाडे व घरांसमोर नागरिकांनी दिवे लावून पंतप्रधान मोदींना उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सभापती सौ.रंजनाताई वासकर,कुंडेवहाळ सरपंच श्री.सदाशिव वास्कर,युवा नेते श्री.अनुज जितेकर व लोकनियुक्त सरपंच श्री.मंगेश दादा शेलार,उपसरपंच श्री. सागरभाई आंग्रे यांच्या हस्ते पहिला ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर गणेश मंदिर येथे भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले.जय विश्वकर्मा महाराज की जय,”भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्,जय श्री राम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी बोलताना श्री. प्रथमेश पुंडे, श्री.कैलास शेलार व श्री.राम महाडिक यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गेल्या २५ वर्षांत भारताला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. त्यांच्या या अलौकिक नेतृत्वाला आणि सेवाकार्याला पाठबळ देण्यासाठी, तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभावे या प्रार्थनेने आम्ही करंजाडेत’आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबवला आहे.”
या उपक्रमाला नागरिकांचा, विशेषतः महिला व युवकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास सौ.रंजनाताई वास्कर,कुंडेवहाळ सरपंच श्री.सदाशिव वास्कर,युवानेते अनुज जितेकर,श्री. मंगेशदादा शेलार, उपसरपंच श्री.सागरभाई आंग्रे,श्री.सत्यनारायण शर्मा यांसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत पंतप्रधान मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि हा अनोखा दीपोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला.



Be First to Comment