Press "Enter" to skip to content

पनवेल गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी श्री औदुंबर पाटील , सकल मराठा समाज मंडळातर्फे सत्कार

पनवेल : मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पनवेल गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा पदभार श्री. औदुंबर पाटील साहेब यांनी स्वीकारल्यानिमित्त सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी यांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. औदुंबर पाटील यांनी यापूर्वी कोपरखैरणे पोलीस ठाणे तसेच पनवेल वाहतूक शाखेत प्रमुख पदावर कार्यरत असताना आपल्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध आणि प्रभावी कार्यशैलीची छाप उमटवली आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी प्रशासन सक्षमपणे हाताळणारे अधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव आणि कार्यक्षमतेमुळे पनवेल गुन्हे शाखेच्या नव्या जबाबदारीकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष रामचंद्र जाधव, सचिव सदानंद गजानन शिर्के, सहखजिनदार विश्राम एकंबे, सदस्य राजेंद्र डेरे , शंकर पवार उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेल परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी यांच्या वतीने झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयाची भावना अधिक दृढ झाली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.