Press "Enter" to skip to content

शिवाश्रमातील रहिवाशांसाठी ‘स्नेहभोजन’ उपक्रम ; अॅड. मनोज भुजबळ यांची उपस्थिती


पनवेल : श्री नारायण चैतन्य ट्रस्ट, पनवेल यांच्या वतीने पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील शिवाश्रमातील रहिवाशांसाठी ‘स्नेहभोजन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आश्रमातील रहिवाशांसाठी पारंपरिक केरळी पद्धतीची ओणसद्या प्रेमपूर्वक देण्यात आली.

या कार्यक्रमास भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिका सदस्य अॅड. मनोज भुजबळ उपस्थित होते.

यावेळी श्री नारायण चैतन्य ट्रस्टचे अध्यक्ष भक्तवत्सलन, सचिव जयचंद्रन के. वासू, उदयभानु बालचंद्रन, एम. पी. मोहनन, सुनीलकुमार, अनिलकुमार, ब्रह्मदेव तसेच शिवाश्रमाचे अधिकारी मधुसूदन आचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्नेहभोजनाच्या माध्यमातून शिवाश्रमातील रहिवाशांसोबत स्नेह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.