
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीकाळात खांब नाक्यावरील विविध प्रकारच्या आजारी रूग्णांची अहोरात्र सेवा करणारे डाँक्टर रूग्णांसाठी देवदूतच ठरत आहेत व रूग्णांसाठी करीत असलेल्या सेवेमुळे खरे कोरोना योद्धा ठरले असल्याची प्रतिक्रिया खांब नाक्यावर ऐकावयास मिळत आहे.
सध्या संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. प्रत्येकजण भेदरलेल्या व चिंताग्रस्त अवस्थेत आहे. त्यातच कोरोनाचे रूग्ण गावोगावी आढळू लागल्याने सर्वांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.अशा परिस्थितीत बरेचसे डाँक्टर रूग्णांची सेवा करताना कोरोना पाँझिटिव्ह होऊ लागल्याने खबरदारी म्हणून रूग्णांची लांबूनच तपासणी करीत असताना दिसत आहेत.परंतू रोहे तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या खांब नाक्यावरील दत्त क्रुपा क्लिनिकचे डाँक्टर महेंद्र म्हात्रे ( बी.एच.एम.एस ) व जिवनदीप क्लिनिकचे डाँक्टर बालाजी वाखरकर (बी.ए.एम.एस ) येथील रूग्णांसाठी देवदूतच ठरत आहेत.
खांब नाक्याच्या आजूबाजूला सुमारे ३० गावे,वाड्या-वस्त्या आहेत.
हा संपूर्ण विभाग हा ग्रामीण भाग असल्याने येथील ८०% रहिवासी वर्गाचा व्यवसाय हा शेती व मोलमजुरी आहे.त्यामुळे आर्थिकद्रुष्ट्या येथील रहिवासी वर्ग हा मागासलेलाच आहे.आजारी पडल्यानंतर आपल्याला हमखास बरे करणारे डाँक्टर म्हात्रे व डाँक्टर वाखरकर येथील सर्वच रहिवासी वर्गाला देवदूता समानच वाटत आहेत. आज कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने रक्ताची नाती तुटू लागली आहेत. माणूस माणसाला पारखा होत चालला आहे. अशा कठिण आपत्तीकाळात आपले दवाखाने रात्रंदिवस उघडे ठेऊन सर्व प्रकारच्या रूग्णांना चांगली सेवा देऊन व अस्थेने चौकशी करून सेवा देणारे डाँक्टर म्हात्रे व डाँक्टर वाखरकर दररोज शेकडो रूग्णांची तपासणी करून नाममात्र तपासणी घेऊन रूग्णांना बरे करीत आहेत.त्यांच्या या चांगल्या कामामुळे येथील रहिवासी वर्गाला चांगलाच दिलासा मिळत आहे.त्यातच त्यांच्या क्लिनीकमध्ये समाजातील सर्वच स्तरातील रूग्ण येत असतात. त्यामुळे काहीवेळा एखाद्या रूग्णाजवळ फीचे पैसे नसले तरी अशा रूग्णांची सेवा करण्यातही दोन्ही डाँक्टरांनी आपला हात आखडता घेत नाहीत. उलट मेडिकलसाठी जरी पैसे लागले तरीही वेळप्रसंगी आपल्या जवळचे पैसे देत असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे.
आजारी माणसे ही डाँक्टरांना प्रत्यक्ष देवासमानच असतात. त्यातच आम्ही रूग्णसेवा हीच खरी देवपूजा मानून काम करीत असल्याने कोरोना आजाराचे भय आम्हाला बिल्कुल वाटत नाही. तर आज आपत्तीकाळात विविध प्रकारचे आजारी रूग्णांना धीर देणे व सेवा करणे हे आम्ही आमचे परमकर्तव्य मानत असल्याची प्रतिक्रिया दोन्ही डाँक्टरांनी पत्रकारांना दिली आहे.






Be First to Comment