गव्हाण समुद्रकिनाऱ्याच्या मच्छीमार बांधवांच्या होड्या लावण्यासाठी नवीन जेट्टी
सिटी बेल • गव्हाण •
ग्रुप ग्रामपंचायत गव्हाण हद्दीतील गव्हाण समुद्रकिनाऱ्याच्या मच्छीमार बांधवांच्या होड्या लावण्यासाठी नवीन जीटी बांधून मिळावी म्हणुन गव्हाण येथील कोळी बांधवांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य रवींद्र विश्वनाथ पाटील यांच्याकडे मागणी केली होती. ती मागणी जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीकडून मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद सदस्य रवींद्र विश्वनाथ पाटील यांनी पाठपुरावा करून या जेटी साठी लागणारी मान्यता प्राप्त करून घेतली आणि गव्हाण येथील कोळी बांधवांसाठी सुसज्ज अशी जेट्टी बांधून घेतली त्या जेटीचे उद्घाटन आज करण्यात आले.









Be First to Comment