सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
राजपाल रायझिंग सन स्कुल वावंढळ येथे लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई एनआरआय,लिनस क्लब यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.यावेळी अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला.
खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील राजपाल रायझिंग सन स्कुलमध्ये लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई एनआरआय,लिनीयस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह,रक्तदाब, डोळे तपासणी,चष्मा वाटप,शस्त्रक्रिया करण्यासाठी नाव नोंदणी केली.
महिलांचे आजार,लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी लहान मुलांना योगा शिकविण्यात आला व योगावर लहान मुलांकडून नाच करुन घेण्यात आला. लहान मुलांना शैक्षणिक साहित्याबरोबर खाऊचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून आरोग्यदाई झाडे लावण्यात आली.भविष्यात या परिसरातील आदिवासी भागात जीवन समृद्ध रहाण्यासाठी आरोग्य विषयी माहितीचे शिबिर,परिसरातील महिला व पुरुष यांच्यासाठी योगा प्रशिक्षण सुरू करणार असल्याची माहिती शशी राजपाल यांनी दिली. या आरोग्य शिबिराचा फायदा परिसरातील आदिवासी समाजाला जास्त प्रमाणात झाला. प्रिन्सिपल मीनल फाळे,डॉ. मधुसूदन, सविता नाईक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.








Be First to Comment