सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगेसोयरे व नातेवाईकांची प्रत्येक्ष भेट होणे दुरापास्त झाले आहे. अशातच काम, शिक्षण, क्लासेस व मिटिंग अशा अनेक गोष्टी ऑनलाइन होत आहेत. मात्र सोमवारी (ता.3) रक्षाबंधन देखील अनेकठिकाणी ऑनलाइन साजरे झाले.
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील रवींद्र कदम यांनी देखील ऑनलाइन रक्षाबंधन साजरे केले.
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेक भावांना बहिणींकडे किंवा बहिणींना भावाकडे जाता आले नाही. मग या भावा बहिणींनी चक्क ऑनलाईन रक्षा बंधन साजरे केले. फोनद्वारे ऑनलाइन ओवाळणी व राखी बांधणे झाले. आणि ऑनलाईनच बहिणीचा आशीर्वाद देखील घेतला गेला. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण देखील साजरा झाला. त्यामुळे बहीण व भावना दोघांना ही खूप छान वाटले असे रवींद्र कदम यांनी सांगितले.






Be First to Comment