सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
महेंद्रशेठ घरत समाजाशी बांधीलकी जोपासुन समाजाविषयी असणारी आस्था आपण अनेक वेळा पाहिली आहे. त्यामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्या रुग्णाला दवाखान्यामध्ये पोहोचावीण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात म्हणून त्या समस्येवर मात करण्यासाठी उरण, पनवेल, खालापुर या भागामध्ये यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक ऍम्ब्युलन्स देण्याचे काम महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे.
अनेक शाळामंध्ये कॉम्पुटर ,लॅपटॉप देण्याचे काम केले आहे. सामाजिक सांस्कृतिक, कला, क्रिडा क्षेत्रामध्ये सुध्दा ते सतत रायगडमध्ये अनेक मंडळे, संघटना, असोसिएशन, राजकिय पक्ष या सर्वांना वर्षभर मदत करतच असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बंधु, ज्यांच्या लेखणीमध्ये खुप मोठी ताकद असते अशा अनेक पत्रकरांना ते मदत करत असतात.
कामगार क्षेत्रात अनेक युनियनचे नेतृत्व करताना अनेक प्रकल्पग्रस्त कामगार, बेरोजगार तरुण गरजवंत नागरीक अशांना नोकरी देण्याचे पुण्याईचे काम महेंद्रशेठ घरत करीत आहेत. हे सर्व करत असताना संघटनेच्या माध्यामातुन अनेक सहकाऱ्यांची साथ त्यांना मिळत असते अश्या सर्व कार्यकर्त्यांना स्वखर्चाने दरवर्षी सहलीच्या माध्यमातून भारत भ्रमण घडवून आणण्याचे काम ते न चुकता करत असतात.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत असताना अनेक मित्र त्यांनी कमावलेत रायगडमध्ये अनेक नेते आहेत पण त्यामध्ये स्वतःच्या व्यतिरिक्त आपला कार्यकर्ता सुद्धा मोठा झाला पाहिजे हे ब्रीद मनामध्ये ठेऊन मग आपले स्वीय सहायक असो, बॉडीगार्ड असो, डॉयव्हर असो, शिपाई असो,त्यांच्या सोबत त्यांना सदैव मदत करणारे त्यांचे मित्र असो या सर्वाना घरे बांधुन देण्याचे काम, आर्थिक मदत देण्याचे काम, किंवा ब्लॉक देण्याचे काम महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे. या सर्वामध्ये रांजणपाडा, जासई या गावातील तरूण मुरूलीधर ठाकुर यांच्याशी त्यांची ओळख सुमारे 20वर्षापुर्वी झाली आणि ओळख चांगल्या मैत्रीत रुपातंर झाली सतत शेठच्या खांदयाला खांदा लावून काम करत शेठचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. अशा जिवलग मित्राला मैत्रीची पोचपावती म्हणून मैत्रीदिनाच्या शुभमुर्हतावर सुमारे १ कोटी किंमतीचा फ्लॅट सस्नेह भेट स्वरूपात दिला आहे.






Be First to Comment