अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा पनवेल तर्फे सर्व रोग निदान शिबीर संपन्न
सिटी बेल • पनवेल • संजय कदम •
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा पनवेल तर्फे हनुमान मंदिर, पोदी नं. 3, सेक्टर-16 , नवीन पनवेल येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळ्याचे नियोजन केले आहे, या निमित्ताने सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला स्वामी सेवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

या निमित्ताने श्री गुरूचरित्र, भागवत, नवनाथ या ग्रंथाचे पारायण, प्रहर सेवा, नित्य विशेष याग, त्रिकाळ आरती तसेच विविध आध्यात्मिक सेवा पार पडली तसेच दिंडोरी प्रणित मार्गाच्या 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या नुसार रक्तदान शिबीर व सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी तसेच नाडी परीक्षण आणि सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले होते. डॉ. दिलीपकुमार पाटील व डॉ. सौ .गभाले यांच्या सहकार्याने सदर शिबीर संपन्न होऊन २८० रुग्णांनी याचा लाभ घेतला .









Be First to Comment