कोरोनाचे सावट असताना हि बहीण भावाच्या प्रेमात उत्साह
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
बहीण भावाच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.या दिवशी बहीण भावाला ओवाळून भावाला दिर्घायुष्य लाभुन भावाला सर्वसुख मिळावे या साठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करते तर भाऊ हि आपल्या बहिणीचे प्रेम नेहमीच आपल्या बरोबर रहावे यासाठी याचना करत बहिणीच्या रक्षणासाठी सदैव खंबीर असतो.दर वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येत असतो तर याच दिवशी नारळी पोर्णिमेचा सण असल्याने कोळी बाधवांच्या आनंदाला हि उधाण आलेल असते.कोळी बांधव सायंकाळी दर्या राजाला नारळ अर्पण करतात यावर्षी सगळी कडे कोरोना विषाणूचे संकट असल्याने सणावर बंधने आली आहेत.परंतु स्वतःची काळजी घेत सण साजरा करण्यात येत आहे.पेण मध्ये रक्षाबंधना दिवशी आपल्या लाडक्या भाऊरायासाठी खास पसंतीच्या आणलेल्या राख्या भावाच्या हातावर प्रेमाने बाधुन बहिणीनी भावाचे औक्षण केले तर भावांनी बहिणीला आवडेल अशी मनपसंत भेट वस्तु देत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.






Be First to Comment