Press "Enter" to skip to content

जिजामाता हॉस्पिटल जासई येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

जिजामाता हॉस्पिटल जासई व सुयश हॉस्पिटल सिवूडस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दि 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उरण तालुक्यातील जिजामाता हॉस्पिटल जासई येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रुग्णांची बी एम डी,ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, इसीजी तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शिवाय हाडांचे आजार -मनक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, स्त्री रोग -गर्भ पिशवीचे आजार, गर्भाशयाच्या गाठी, पांढरे पाणी जाणे, अनियमित पाळी, मूल न होणे, मूत्र रोग -मूतखडा, प्रोटेस्ट, मूत्र मार्ग विकार, दम्याचे आजार, मधुमेह, कर्करोग, फुफुसाचे आजार आदी आजारावर मोफत मार्गदर्शन तसेच शस्त्रक्रियेची गरज असल्यास ती मोफत व अल्प दरात करण्यात येणार आहे. उपचाराची गरज असणाऱ्या व्यक्तीला सर्व अत्याधुनिक उपकरणांनी युक्त औषधोपचार व शस्त्रक्रिया डॉ लता देराश्री, डॉ धवल देराश्री व जिजामाता हॉस्पिटल स्टाफ तर्फे करण्यात येणार आहे. रुग्णांनी येताना पूर्वीचे सर्व रिपोर्ट, केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड, आधारकार्ड सोबत आणावे.व या तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9321932380 या नंबर वर संपर्क साधावे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.