कु.संस्कृती विजय धुमाळ ८९.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम
रोहे तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळा
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील ग्रामीण आणि अती दुर्गम भागातील मुंबईकर ग्रामस्थ मंडळ भाळगाव संस्थेचे कै. द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक सुयश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत इयत्ता दहावी परीक्षेचा एकूण निकाल ८६.४८ टक्के इतका लागला आहे.
शाळेत सर्व प्रथम कु.संस्कृती विजय धुमाळ ८९.२०%, गुण मिळाले तर द्वितीय क्रमांक कु.सानिका तुकाराम सुतार८६.६०%, तसेच कु.समृद्धी सचिन बैकर ८६.६०% , तृतीय क्रमांक कु.लीना जनार्दन मोहिते ८४.६०%, चतुर्थ क्रमांक कु.अभिराज संदीप गोरीवले ८४.००% , पाचवा क्रमांक कु.हर्षवर्धन रामचंद्र धामणे ८३.६०% यांनी संपादीत करत येथील विद्यार्थी वर्गाने शाळेची परंपरा कायम ठेवली आहे, तसेच विशेष बाब म्हणजे या शाळेत दुर्गम भागातील मुचने आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्याने बोर्ड परीक्षेत नोंद करता येईल असा प्रथमच मुलगा पास होण्याचा चमत्कार कु अक्षय बाब्या मुकम याने सर्व विषयात ३५ मार्के मिळवून ५०० पैकी १७५ गुण मिळवत सरासरी गुण ३५ % करत एक रायगड जिल्ह्यात चमत्कारच केला आहे. त्यामुळे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे सर्व पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले. तसेच विद्यालयाचे चेअरमन जगन्नाथ कुंडे, शाळा समिती सदस्य मारुती नाकती, जनार्दन जामकर, गणेश ठाकूर,हरिश्चंद्र धुमाळ, संजय नाकती, एकनाथ पैर, राजेंद्र कुंडे, संदीप जामकर, सौ अंजली कुंडे, तसेचसर्व ग्रामस्थ मुख्याध्यापक मार्गे, शिक्षक अडसूळ, गाडे, देवळेकर, पाटील सर, घाग, निलेश व पांडुरंग आदींनी तसेच शैक्षणिक व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून या विद्यार्थ्यांचे व वर्ग शिक्षकांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.






Be First to Comment