सिटी बेल • राकेश पाटील • उरण •
ऐन कोरोना महामारीत देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वच सेवा ठप्प असताना कावीळ सारख्या रुग्णांना 24 तास सेवा देणाऱ्या या काळातील देवदूताचा यथोचित मान सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने मोठी जुई गावातील जेष्ठ नागरिक परशुराम भोईर उर्फ अप्पा तसेच सारडे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व विकास पाटील यांचा यथोचित मान सन्मान साई कृपा इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि तर्फे करण्यात आला.
सत्कार समारंभाचे स्वरूप ही मायेची उबदार शाल व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले. सदर प्रसंगी सत्कारमूर्तीनी भावना प्रकट केली की, अश्या प्रकारचा सत्कार आज पर्यंत आमचा कुणी ही केला नाही. आपल्या सर्वाचे खुप खुप आभार.
तसेच त्यांनी आपली भावना विशद करताना म्हटले की, कोणत्याही प्रकारच्या रुग्ण मध्ये सेवा देताना आम्हाला परमेश्वर प्रेरणा शक्ती देतो आणि परमेश्वर आमच्या कडून ही सेवा करून घेत आहे. या कार्यक्रमा प्रसंगी साई कृपा इन्फफॉर्मशन टेकनॉलॉजि चे सर्वे सर्वा राकेश पाटील सर, सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर, कार्याध्यक्ष रोहित पाटील, सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर, सिएचए संघटनेचे सदस्य हरीश म्हात्रे ,मिलींद म्हात्रे , उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment