आज सापडले १९ नवीन रुग्ण : बाधित रुग्णांची संख्या पोहोचली ६२१ वर
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
रोहे तालुक्यात कोरोनाची संख्या आटोक्यात येत नसून आज नव्याने १९ नवे रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्ण संख्या ही ६२१ वर पोहोचली आहे. रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे.त्यात रोज नवीन रूग्ण सापडू लागल्याने तालुक्यासह शहराचेही टेन्शन वाढू लागले आहे.तर रोजच्या वाढत चाललेल्या आकडेवारीने संपूर्ण तालुक्यात भिती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने १९ नवे रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ६२१ वर पोहोचली आहे.
सध्या १६५ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात १५ जण मयत झाले आहेत.तर ४४१ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तरि घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
अजूनही वेळ गेली नसून कोरोना या महाभयानक आजाराबाबत प्रत्येकाने जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी सजग राहिले पाहिजे अशाप्रकारचा उपदेश प्रशासनाकडून वेळोवेळी केला जात असल्याने प्रशासनाचा आदेश व सुचनांचे पालन करून व दिलेले नियम पाळून कोरोनाचा आजार आपल्याजवळ येणार नाही यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.






Be First to Comment