सिटी बेल • पनवेल • वार्ताहर •
क्रेडिट कार्डची मुदत संपली असून ते बंद होणार आहे असे सांगून नवीन कार्ड देण्यासाठी दोन लाख 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नवीन पनवेल येथे घडला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर 18, नवीन पनवेल येथील श्यामबाबू मदिरेड्डी यांना मोबाईल नंबर वरून फोन आला यावेळी समोरून बोलणाऱ्या महिलेने रिया शर्मा असे नाव सांगून एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. व तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, नवीन कार्ड घेण्यासाठी त्यांच्याकडून माहिती मागितली. यावेळी मदिरेड्डी यांनी माहिती दिली. त्यानंतर एसबीआय क्रेडीट कार्ड ची मुदत संपत आली असल्याने फोन मॅनेजर यांच्याकडे ट्रान्सफर केला. यावेळी नाव, जन्मतारीख, पत्ता व कार्डचे नंबर मागितले. त्यानंतर मोबाईलवर दिनेश मिश्रा या व्यक्तीने ओटीपी नंबर पाठवला. तो नंबर मदिरेड्डी यांच्याकडे मागितला. मदीरेड्डी यांनी नंबर दिला असता त्यांच्या खात्यातून दोन लाख 80 हजार 956 रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.








Be First to Comment