सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील ग बा वडेर हायस्कुल येथील कु.सुजल विठ्ठल बैकर याने (रा.भार्जे)एस एस सी परीक्षेत 93.80 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. शाळेने देखील आपल्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. सुजल चे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे शिपाई पदावर आहेत. सुजल ने जिद्ध, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सुजल बैकर याच्या दैदिप्यमान यशानंतर त्याचे सर्व स्थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सुजलने सांगितले की माझ्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकवर्गाचे महत्वाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. एस एस सी परीक्षेत केवळ उत्तीर्ण न होता , चांगलं यश संपादन करण्याचे माझे ध्येय होते. व ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे. सुजलच्या या यशानंतर सुधागड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी दीपक पवार, नरेश शिंदे, राजेश गायकवाड, मोरेश्वर कांबळे, रोहिणी जाधव, नूतन शिंदे, मनीषा कांबळे, संजीवनी जाधव, आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment