Press "Enter" to skip to content

अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने कण्यांची रांगोळी

गणेश भक्तांनी घेतले महडच्या वरदविनायकाचे दर्शन

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

मुंबई पुणे महामार्गावर हे अष्टविनायकापैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर ,चौक, खोपोली , कर्जत ,पनवेल ,रसायनी या परिसरातील हजारो भक्तांनी आपल्या लाडक्या वरद विनायकाचे दर्शन घेतले.त्याचबरोबर आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने सुंदर अशी मनमोहक रांगोळी श्री वरद विनायक फुल व कडधान्ये रांगोळी मंडळ महड यांच्या माध्यमातून काढण्यात आली. तसेच गणेश भक्तांना दर्शन घेण्यासाठी वहानांची व्यवस्था तसेच थंड पाण्यांची व्यवस्था ठिक – ठिकाणी करण्यात आली होती.

या रांगोळी साठी अर्थ साहाय्य म्हणून कपिल पितळे – बदळापूर,संतोष भोर रविंद्र झवरे,रोहित प्रभु – चांभार्ली वरद पवार – कल्याण,दिलीप पै.- पनवेल यांनी केले.वातावरण उष्णता जरी वाढली असली तरी सुद्धा अनेक भक्तांनी या बाप्पाचे दर्शन घेतले.या रांगोळी मध्ये श्री राम तसेच विठ्ठलांची प्रतिकृती या रांगोळी मधून साकारण्यात आली होती.

महडच्या मंदिरात साकारण्यात आलेली सुंदर अशी रांगोळी

अशीच सुंदर रांगोळी रवि आचर्य- नेरळ, मंगेश देशमुख- माणकिवली, तुलशिराम ठोंबरे- टेभरी, सचिन पाटील -कलोते,उत्तम जगदाळे पनवेल, किशोर म्हात्रे – बदलापूर, स्मिता म्हात्रे – बदलापूर, अतुल तट्टू – महड,साक्षी देशमुख,स्नेहल देशमुख,श्रेया देशमुख – माणकिवली, स्वरा पाटील – जिवन ठोंबरे,भरत ठोंबरे ,तन्मय पाटील – कलोते, यांनी साकरलेली होती.

यामध्ये ही रांगोळी १०/३० फुट असून यामध्ये सप्त कलर्स तांबडा,नारंगी, पिवळा,हिरवा,जांभळा,निळा, पांढरा लाल, अदि रंगाचा वापर करण्यात आलाकणी,साबूदाने,काळा तीळ एकुन १०० किलोचा समावेश करण्यात आला.

चौकट : ही कडधान्यांची रांगोळी काढण्यासाठी २६ ते ३० तास लागले ह्या मध्ये माझ्या सहकार्यांचा सिहांचा वाटा असून वरद विनायक फुल रांगोळी मंडळ यांनी सर्वोत्तोपरी सहकार्य केले ( रांगोळी कलाकार – मंगेश देशमुख मानकिवली )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.