Press "Enter" to skip to content

रामनाथ पंडित यांची नियुक्ती

काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल : महेंद्रशेठ घरत

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते रामनाथ नामदेव पंडित यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॅशिंग, कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. याबद्दल त्यांना शेलघर येथील सुख:कर्ता या निवास्थानी ऑफिस मध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हि दिल्या.

यावेळी बोलताना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले की, भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे सध्या देशभर सर्वत्र काँग्रेस पक्षाची डिजिटल सद्स्य नोंदणी चालु आहे. महाराष्ट्र राज्यात प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने डिजिटल मेंबरशिपचे काम चालु आहे.अनेक कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होऊन चांगले कामही केले आहे. परंतु याबाबत त्यांनी कधीही काँग्रेस पक्षाच्या पदांची अपेक्षा केलेली नाही. परंतु काही पदाधिकारी, कार्यकर्ते गेली अनेक वर्षे २५/३० वर्षी जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी मध्ये काम करत आहेत. परंतु काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम AICC,व MPCC कडुन येतात त्यात सहभागी होत नाहीत.पक्षाच्या कुठल्याही मोर्च्यात, आंदोलनात सहभागी होत नाहीत पण त्यांची पद मात्र अभादीत आहेत. परंतु या पुढे जे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात, मोर्च्यात, आंदोलनात सहभागी झाले नाहीत तर त्यांच्या पदांचा नक्कीच फेरविचार करण्यात येईल. फक्त घरात बसुन व्हाट्सअँपच्या माध्यमातून पक्षाला सुचना करण्यापेक्षा पक्षाचे काम ग्राऊंड लेवलला केल तर नक्कीच पक्षाची ताकद वाढेल.परंतु पक्षाचे कुठलेही काम करायचे नाही आणि उगाचच दुसऱ्यांवर बोट दाखवायची यामुळेच काँग्रेस पक्ष खाली चालेला आहे. या पुढे जे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाच्या पदांवर असुन देखील यापुढे जे कार्यक्रम AICC व MPCC कडुन येतील त्यात सहभागी झाले नाहीत तर नक्कीच ते खपवून घेतले जाणार नाही. जे कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाचे काम करतील त्यांचा योग्य तो सन्मान काँग्रेस पक्षात राखला जाईल.असे महेंद्र घरत यांनी सांगितले.

रामनाथ पंडित यांनी डिजिटल मेंबरशिप अभियानात चांगलं काम केल्याची पोचपावती महेंद्रशेठ घरत यांनी रामनाथ पंडित यांना दिली. रामनाथ पंडित यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.