दिपक फर्टीलाझर व ईशान्य फाउंडेशन मार्फत नेत्र तपासणी शिबीर
सिटी बेल • तळोजा •
दिपक फर्टीलिलाझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशन व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पाले खुर्द येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरास तळोजा विभागातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २०१ रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यातील ६० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले, त्यांचे ऑपेरेशन पनवेल येथील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथे दिपक फर्टिलायझर मार्फत मोफत केले जाणार आहे. तसेच ८३ रुग्णांना दृष्टी दोष असल्याचे निदान झाले असून सदर रुग्णांना दिपक फर्टिलायझर्स मार्फत अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.

शिबिराचे उद्घाटन राजेंद्र थोरात- प्लांटहेड के ८ दिपक फर्टिलायझर व सौ वंदना राजेंद्र थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी जयश्री काटकर- एच आर हेड दिपक फर्टिलायझर, अरुण शिर्के- एव्हीपी कॉर्पोरेट अफेर्स , कृष्णनाथ बेलेकर- सिनिअर जीएम कॉर्पोरेट अफेर्स दिपक फर्टिलायझर आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप काकडे- सिनिअर मॅनेजर, सी एस आर दिपक फर्टिलायझर यांनी प्रस्थावित केले व योगेश पाटील- प्रकल्प वव्यवस्थापक ईशान्य फाउंडेशन व टीमने शिबिराचे नियोजन केले. कु सुनीता रासवे- नेत्रचिकित्सक लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व टीमने नेत्र तपासणी केली.








Be First to Comment