प्रेस संपादक व पत्रकार संघाचा खालापूर तहसीलदार यांना सवाल ?
सिटी बेल लाइव्ह / खालापूर ( समीर बामुगडे)
खालापूर तालुका आणि तालुक्यातील दहागाव छत्तीशी विभागातील मुजोर कंपनी व्यवस्थापनाच्या कामगारांच्या आरोग्याविषयी जागरूक नसून कोरोना चे रुग्ण आता कंपन्यानमध्ये आढळण्यास सुरुवात झाली आहे.कित्येक वेळी ग्राम पंचायत प्रशासनाने कंपनी प्रशासनाला पत्र दिल आहे या धोकादायक परिस्थितीत खालापूर तहसिल प्रशासन या मुजोर कंपन्यांवर कारवाई का करत नाही ? हा प्रश्न जनतेसह पत्रकाराना पडला आहे. खालापूरच्या या महत्त्वाच्या प्रश्नाची माहिती व्हावी याकरिता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष किरण बाथम आणि कार्याध्यक्ष समीर बामुगडे यांनी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांची भेट घेतली.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष शेवाळे आणि सचिव जतिन मोरे उपस्थित होते. कोरोनाच्यापार्श्वभूमीवर संचारबंदीमध्ये हुतामाकी पी पी एल आणि पारले जी आणि इतर कंपन्यानी संचारबंदीचे उल्लंघन करून ५० टक्क्यांहून अधिक कामगारांची बसमधून वाहतूक सुरूच ठेवली होती. तसेच यावेळी पनवेल सारख्या प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांची देखील कंपनीमध्ये राहण्याची कोणतीच व्यवस्था न करता त्यांची खाजगी वाहनाने वाहतूक सुरूच होती. त्यामध्ये सोशल डिस्टनसिंग चे पालन न करणे, कामगारांची आरोग्य तपासणी न करणे गाड्यांमधून तत्कालीन नियमांची पायमल्ली यासारख्या अनेक कारणास्तव याकंपन्यांवर कारवाई व्हावी याकरितापत्रकार संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष शेवाळे यांनीखालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देण्यात आले होते. परंतू यावर तहसिल प्रशासनाकडून या मुजोर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.या घटनेला तीन महिने उलटून गेले आहेत. तरी ही बाब पुन्हा एकदा तहसिल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कंपनी प्रशासन आणि प्रेस संपादक व पत्रकार संघाचे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष शेवाळे यांची या आठवड्यात सुनावणी घेण्याचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी पत्रकार संघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष किरण बाथम आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट केले.






Be First to Comment